मुंबई : शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला आयोगासमोर आज तीन चिन्ह आणि नाव सादर करायचे होते. त्यामुळे कोणत्या गटाला कोणतं नाव मिळणार यावर सगळ्यांचं लक्ष होतं. इतक्यात निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नरेश म्हस्के ?
निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्यावर मी खूप समाधानी आहे आणि खूप आनंदही झालेला आहे की जे तत्त्व, बाळासाहेबांचं हिंदूत्व घेऊन आम्ही जे पुढे चाललो आहोत आणि तेच नाव आम्हाला मिळालं असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलं. नरेश म्हस्के यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झालेला आहे. जी भूमिका घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो, जो उठाव केला होता. बाळासाहेबांचं हिंदूत्वाचं तत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार. तेच नावा आता आम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे.
तसेच, चिन्हांबाबत निवडणूक आयोगाकडून आम्हाला उद्या सकाळपर्यंत वेळ मिळालेली आहे आणि तोपर्यंत आम्ही विचारविनीमय करून चिन्ह देऊ, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुंबईतील ही प्रतिष्ठेची लढाई होणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gold | आता दिवाळीत ‘या’ सोन्यात करा गुंतवणूक आणि मिळवा भरपूर फायदा
- Shivsena । शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले, तर ठाकरे गटाला…
- Narendra Modi | “गुजरात तुम्हाला उद्ध्वस्त करुन टाकेल”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
- Shivsena | ‘धनुष्यबाण’ गोठलं! परंतू शिवसेनेकडे अगोदर कोणती चिन्हं होती?, जाणून घ्या त्यामागचा इतिहास
- NCP । आधी म्हणाले, काका पुतण्याने मला कोंडून ठेवलं, आता म्हणतात, पवार माझं दैवत; राष्ट्रवादीच्या सूचनेनंतर पाटलांची माघार