Share

Naresh Maske | “रेड्यांनी शिंगे उगारली की…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे सडेतोड प्रत्युत्तर 

Naresh Maske | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत होत्या. ही गुवाहाटीवारी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी आहे. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “आवाजही न फुटणाऱ्या बावळट पेंग्विनपेक्षा रेडे परवडले. रेड्यांनी शिंगे उगारली की बिळात जाऊन लपू नका.” त्याचबरोबर लहान मुले खेळण्यातील सुदर्शन चक्र फिरवतात, तसेच त्यांच्या हातात आहे. एक फुंकर मारली की ते उडून जाईल,” असा टोलाही नरेश मस्के यांनी लगावला आहे.

दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) चांगलेच संतापले आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. संजय गायकवाड म्हणाले, “संजय राऊत यांनी ५० रेडे गुवाहाटीला चालले आणि आमचे सुदर्शन चक्र त्याचा नायनाट करेल, अशी भाषा वापरली. ते आम्हाला रेडेच म्हणत असतील तर कदाचित आम्ही ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्यांच्या तोंडून वेद बोलावले असतील तो हिंदुत्वाचा वेद म्हणणारे रेडे नक्कीच आहोत.

पुढे ते म्हणाले, “तुम्ही सारखे आम्हाला रेडे म्हणता तुमची औकाद एखाद्या गावात सांडासारखा मोकाट बोकड सोडलेला असतो. ज्याला कोणी कापत सुद्धा नाही. ज्याचा वास येतो, ज्यावा कोणी स्पर्श करत नाही. अशा बोकडांची तुम्ही औलाद आहात.”

काय म्हणाले होते संजय राऊत?

“शिवसेनेच्या स्थापनेनंतर १८० सेना निघाल्या. पण दोनच टिकल्या एक भारतीय सेना आणि दुसरी आपली शिवसेना. काही लोक म्हणत आहेत की, २०१९ चा बदला आता घेतला, मात्र शिवसेनेचा बदला घेणाऱ्यांची १०० पितरं खाली यायला पाहिजेत. बदला तर आम्ही घेणार. या मुंबईसाठी पन्नास वर्षे शिवसेनेने रक्ताचे पाणी करून तुम्हाला मोठं केलं मात्र तुम्ही शिवसेना फोडली नाही तर, तुमचे नशीब फोडले आहे. या पुढे आपल्या नशिबात दिवाळी आणि इतरांच्या होळी असेल.”

महत्वाच्या बातम्या :

Naresh Maske | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now