राज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक; भाजपकडून नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर

नवी दिल्ली : 1 जुलै रोजी पी. जे. कुरियन यांचा उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. आता राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी कुरियन यांच्या नंतर कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरु झाली आहे. भाजपकडून,नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधकांना सर्व सहमतीने कुरियन यांच्या जागी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी निवडणुका टाळाव्यात असं आव्हान केलय.

या पदासाठी भारतीय जनता पार्टी अकाली दलाचे नरेश गुजराल यांचे नाव पुढे करेल अशी चर्चा आहे. त्यांना बिजू जनता दलाची साथ मिळेल अशी भाजपला अशा आहे. नरेश गुजराल हे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे पूत्र आहेत. त्यांचा जन्म 19 मे 1948 रोजी पंजाबातील जालंधर येथे झाला. शिरोमणी अकाली दलातर्फे ते राज्यसभेत निवडून गेले आहेत. त्यांचे शिक्षण नवी दिल्लीमधील सेंट स्टीफन्स महाविद्यालयात झाले. राज्यसभेतील एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. गुजराल संसदेतील विविध अभ्यासविषयगटांचे सदस्य आहेत.

कर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार?