देवरूखचे नरेंद्र तेंडोलकर उत्कृष्ट प्राध्यापक

देवरूख : तेंडोलकर यांचे प्राथमिक शिक्षण कुडाळ येथे, तर पदवी शिक्षण सावंतवाडीत झाले. त्यांनी भौतिकशास्त्रात एमएस्सी आणि डॉक्टरेट मिळवली. मुंबईत के. जे. सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार व सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात त्यांनी १६ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. सन २००७ पासून प्राचार्य म्हणून देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात त्यांची नियुक्ती झाली. तेंडोलकर यांचे चार संशोधन प्रकल्प तसेच सहा संशोधन पेपर्स सादर झाले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेण्यात आली आहे. डॉ. तेंडोलकरांच्या विशेष कामगिरीची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली असून यंदाचा उत्कृष्ट पुरस्कार त्यांना घोषित केला आहे.