अजून एका केंद्रीय मंत्र्याचे विधान वादात ; कॉंग्रेसची शेपूट आणि मिशीशी तुलना

टीम महाराष्ट्र देशा: मोदी सरकार मधील मंत्री आपल्या वक्तव्याने सरकारला अडचणीत आणण्याचे काम काही सोडताना दिसत नाहीत कौशल्यविकास आणि रोजगार राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी नुकतच संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याने देशभरात सरकारविरोधात रोष असताना आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्यांने आपल्या वक्तव्याने वाद ओढून घेतला आहे.

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शिवपुरीच्या कोलारस येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना ‘शेपूट आणि मिशीमधील केसांमध्ये जेवढं अंतर असतं, तेवढंच अंतर मोदी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. मोदींची बरोबरी करायला काँग्रेसला अजून अनेक वर्ष लागतील,’अस वादग्रस्त विधान करून नव्या वाला तोंड फोडलय.