fbpx

सबका साथ सबका विकास प्रत्यक्षात आणणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प : आमदार नरेंद्र पवार

टीम महाराष्ट्र देशा : शिक्षण, शेती, आरोग्य, रोजगार निर्मिती, ग्रामविकास अशा सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करत सर्वसामान्य जनतेच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करणारा म्हणजेच सबका साथ – सबका विकास साधणारा अर्थसंकल्प आहे असे मत आमदार नरेंद्र पवार यांनी अर्थसंकल्पावर बोलताना व्यक्त केले. योजना राबवत असतानाच युवक आणि महिला आणि उद्योजकांना उर्जा देणारी तरतूद करून सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री  पियुष गोयल यांचे अभिनंदन.

सरकारने यापुर्वी शेतकऱ्यांचे जिवनमान समृध्द करण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. त्यात आता 5 एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी 6 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. या सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी 60 वर्षानंतर 3 हजार रूपये निवृत्ती वेतन योजना, लघु उद्योगांना 1 कोटी रूपयांचे कर्ज, न्युनतम वेतन 10 हजारावरून 21 हजार रूपयांपर्यंत वाढ यासारखे निर्णय घेतले. सर्वात महत्वाचे म्हणजे देशातील 3 कोटी मध्यम वर्गीय व नोकरदार वर्गीयांना आयकरात 5 लाखाची सिमा वाढवुन दिल्याने त्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे.

“सबका साथ – सबका विकास” व्याख्येचा आणखी विस्तार करत नवभारताच्या निर्मितीकडे वाटचाल करण्यास मोलाचा सहभाग असणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला आहे असेही आमदार श्री. नरेंद्र पवार बोलताना म्हणाले.