नरेंद्र पाटील पक्ष सोडणार नाहीत : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आहे. स्थानिक राजकारण्यांकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून काल निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. त्यानंतर राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र नरेंद्र पाटील पक्ष सोडून जातील असं वाटत नाही, माथाडी कर्मचारी पवार साहेबांच्या मागे आहेत, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आहे. स्थानिक राजकारण्यांकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून काल निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. डावखरे यांनी भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व सुरु असताना आता राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

निरंजन डावखरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मात्र यावेळी निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील आले होते.त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत. निरंजन डावखरेंप्रमाणेच नरेंद्र पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत.नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. मित्राला साथ देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना नरेंद्र पाटील यांनी दिली.