fbpx

‘2019 ची निवडणुक ही मोदी विरूद्ध सर्व अशी नाही तर जनता विरूद्ध आघाडी अशी आहे’

narendra modi in gujrat

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभेची 2019 ची निवडणुक ही मोदी विरूद्ध सर्व अशी नाही तर जनता विरूद्ध आघाडी अशी आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद असल्यामुळेच मोदींचं अस्तित्व आहे. जनतेच्या आशीर्वादानेच मोदींचा उदय झाल्याचं सांगत जनतेचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने केली आहे. मोदींनी ANI या आघाडीच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

दरम्यान, याच मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस,सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. मोठ्याने बोलणारे नेते जामीनावर बाहेर आहेत. आर्थिक गैरव्यवहाराचा त्यांच्यावर आरोप आहे आणि तेच लोक आज खोटी माहिती पसरवित असल्याचा घणाघात त्यांनी केला.

काही लोक हे फक्त पहिले आपल्या कुटुंबाचाच विचार करतात ही वस्तुस्थिती आहे. 40 वर्ष हा देश कुणी चालवला आणि कशाप्रकारे चालवला हे प्रश्न विचारायचे नाहीत का? असा सवाल देखील मोदींनी उपस्थित केला आहे.