नरेंद्र मोदींनी ‘२०१४’ मध्ये दिलेली आश्वासने फोल आणि कुचकामी; प्रकाश राज

prakash raj , narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे विरोधक मोदींवर टीका करत असतात. आता पुन्हा अभिनेते प्रकाश राज यांनी खल्ली उडवणारे ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळुरू येथील रॅलीनंतर दुसऱ्याच दिवशी अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये विकलेली प्रॉमिस टूथपेस्ट कोणाच्याही चेहऱ्यावर हसू फुलवू शकली नाही. असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरुत झालेल्या रॅलीत प्रॉमिस टूथपेस्ट पुन्हा विकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या आश्वासनांना भुलून जाऊ नका असेही आवाहन प्रकाश राज यांनी केले आहे. भाजप ‘ध्येय २०१९’ साठी मैदानात उतरले आहेत. मात्र सामान्य वर्ग,शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहेत. नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने फोल आणि कुचकामी ठरली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका असे म्हणत प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात ट्विट केले आहे.