‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’

मोदींनी दिला नवा नारा

‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तणावग्रस्त जम्मू काश्मीरमधील समस्या आगामी काळात कशी सोडवली जाणार यावर भाष्य केलं.

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.यावेळी देशातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेत आहे हे सांगितल .अशांत जम्मू- काश्मीरवर मोदीकाय बोलतात याकडे देशवासीयांच लक्ष लागलं होत यावेळी काश्मीरबाबत मोदी म्हणाले,

“दहशतवादाविरोधी लढ्यासाठी अनेक देश भारतासोबत आहेत. दहशतवाद कधीही खपवून घेतला जाणार नाही. मात्र काश्मीरचा प्रश्न हा ना गोळीने ना शिवीगाळीने सुटेल, गळाभेट हाच त्याला पर्याय आहे. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” एकीचं बळ हीच देशाची ताकद आहे. हा देश गांधी आणि बुद्धांचा आहे. इथे सर्वजण समान आहेत. न्यू इंडियाचं स्वप्न साकारण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, असंही मोदींनी नमूद केलं.