नरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर भाष्य करणारे संक्रांत स्पेशल व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले आहे.त्यात त्यांनी मोदी संक्रांतनिम्मित पतंग उडवत आहेत मात्र त्या पंतगाला ‘नव्या थापा’ असे शीर्षक देऊन मोदींवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे.

मोदी सरकारने नुकताच आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यावरूनचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या या निर्णयाला देखील मोदींची ही नवी थापच आहे अस या व्यंगचित्रामधून सुचवलं आहे.त्यांच्यासोबत अमित शहा, भक्त आणि मिडीया उपस्थित आहेत. मेक इन इंडिया, नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, देशी काळा पैसा, डिझेल-पेट्रोलचे दर, कर्जमाफी, प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार, परदेशी काळा पैसा, नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी आणि इतर असा मजकूर असलेले पतंग गच्चीवर पडल्याचेही राज ठाकरे यांनी दाखवले आहे.या व्यंगचित्रात भाजपने तिथेच थांबून गच्चीकडे पाठ दाखवली असल्याचेही दाखवले आहे.