विशेष मुलाखत : मोठ्याने बोलणारे नेते जामीनावर बाहेर आहेत,मोदींचा राहुल-सोनियावर हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा- मोठ्याने बोलणारे नेते जामीनावर बाहेर आहेत. आर्थिक गैरव्यवहाराचा त्यांच्यावर आरोप आहे आणि तेच लोक आज खोटी माहिती पसरवित असल्याचा घणाघात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस,सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने केली आहे. मोदींनी ANI या आघाडीच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.नवीन वर्षातली मोदींची पहिलीच मुलाखत असून तब्बल  42 प्रश्नांना  मोदींनी दिली बेधडक उत्तरं दिली.

काही लोक हे फक्त पहिले आपल्या कुटुंबाचाच विचार करतात ही वस्तुस्थिती आहे. 40 वर्ष हा देश कुणी चालवला आणि कशाप्रकारे चालवला हे प्रश्न विचारायचे नाहीत का? असा सवाल देखील मोदींनी उपस्थित केला आहे.Loading…
Loading...