fbpx

कॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३ इंचावर

jitendra awhad

टीम महाराष्ट्र देशा – प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदी नेमणूक होणे हा कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत भाग आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे गऱ्हळ ओकणे हे त्यांच्या मनातील भिती दर्शवते, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

यासोबतच ५६ इंचाची छाती २३ इंचावर आल्यासारखी दिसायला लागली असल्याचे आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर वरून मोदी यांच्यावर टीका केली आहे.

प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदी नेमणूक झाली आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे गांधी कुटुंबाचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भयंकर खुश झाले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निवडीबाबत बोलताना म्हटलंय की या निवडीचा फक्त त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागावरच परीणाम होणार नसून संपूर्ण देशभरात फरक पडेल.