fbpx

नरेंद्र मोदी यांची मंत्रिमंडळाला तंबी, ९:३० च्या आत ऑफिसला हजर व्हा

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवला. त्यानंतर ३० मे रोजी मोदींच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली. यानंतर बुधवारी (१२ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवनियुक्त मंत्रिमंडळाची पहिली बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोदींनी सर्व मंत्र्यांनी कार्यालयात वेळेत येण्याचे आदेश दिले.

केंद्रीय मंत्र्यांनी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्याशिवाय अधिवेशन सुरु असताना, कोणत्याही मंत्र्यांला बाहेर दौरा करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचही त्यांनी म्हंटल आहे. अशा अनेक सुचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. काल (१२ जून) झालेल्या बैठकीत मोदींनी नवनियुक्त मंत्रिमंडळाला हे आदेश दिले आहे.

सर्व मंत्र्यांनी लोकसभेत नव्या जुन्या मंत्र्यांनी एकमेकांना भेटा, चर्चा करा असाही सल्ला मोदींनी दिला. तसेच “प्रत्येक मंत्र्यांनी येत्या पाच वर्षाचा कामाचा आराखडा तयार करा, तुमच्या कामाच्या आराखड्यानुसार कामाचे नियोजन करा आणि कामाला गती द्या”, असेही मोदींनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सांगितले . ‘येत्या १०० दिवसात तुमच्या कामाचा ठसा दिसायला पाहिजे’ असेही मोदींनी मंत्र्यांना बजावले.