नरेंद्र मोदींचे बेटी बचाव; राम कदमांचे ‘बेटी भगाओ?’ – आ. विद्या चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलीची परवानगी नसेल तरी तिला पळवून नेण्याचे आक्षेपार्ह विधान दहिहंडीच्या उत्सवात केले. हे अत्यंत निषेधार्ह विधान असून जमावापुढे असे वक्तव्य करणे चुकीचे आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाव बेटी पढाओ अशी घोषणा करत आहेत तर दुसरीकडे राम कदम त्यांच्या विपरीत जाऊन बेटी भागाओचा कार्यक्रम राबवत आहे. राम कदम नेहमी आपण किर्तनकार असल्याचा टेंभा मिरवत असतात, आपण किती सज्जन आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या कालच्या वक्तव्यातून स्पष्ट होते की ते किती सज्जन पुरूष आहेत, असा टोला त्यांनी लगावला. राम कदम मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहे. वेळोवेळी ते पक्षाची भूमिका मांडत असतात. भूमिका मांडणाऱ्यांची विचारधारा अशी आहे तर पक्षाची विचारधारा काय हे यातून स्पष्ट होते, असेही त्या म्हणाल्या.

आमदार राम कदम यांची तक्रार महिला आयोगाकडे करावी लागेल. मात्र त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. याआधी भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात महिलेबाबत चुकीच्या वर्तनाची तक्रार केली होती मात्र त्यावर कोणीच काही बोलले नाही. आता मुख्यमंत्री राम कदमबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भाजपने राम कदम यांचे प्रवक्ते पद रद्द करावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

You might also like
Comments
Loading...