…हीच विठ्ठल चरणी प्रार्थना; नरेंद्र मोदींनी मराठीतून दिल्या आषाढीच्या शुभेच्छा

narendra modi

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा प्रथमच शासनाने पायी पालखी सोहळा रद्द केला. परंतु तब्बल साडे तीनशे वर्षांची परंपरा लक्षात घेऊन शासनाने मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत प्रमुख संताच्या पादुका पंढरपुरला घेऊन जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात आली.

आषाढी एकदशीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय जय पांडुरंग हरी’ म्हणत मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं कि, “आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी”,

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीहि श्री विठ्ठलाच्या चरणी आज साकडे घातले, कि “महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे”.

यंदा आषाढी वारीसाठी पंढरपुरात एकाही वारकऱ्याला प्रवेश नाही

आषाढी एकादशी : महानायकाने दिल्या विठ्ठलभक्तांना दिल्या मराठीतून हटके शुभेच्छा

‘गरिब कल्याण अन्न योजना’ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार, पंतप्रधानांची मोठी घोषणा