fbpx

नरेंद्र मोदींचा हल्लाबोल! काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी

Rahul-Gandhi-Narendra-Modi-

बंगळुरू: ‘काँग्रेसने किमान कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी’, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. कर्नाटक निवडणुकीत प्रचारसभेत कॉंग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. मोदींनी कॉंग्रेसवर होरदार हल्ला केला. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेसमधून तीव्र पडसाद उमटत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी, कर्नाटकच्या उत्तरेकडील भागामध्ये आढळणाऱ्या मुधोल कुत्र्यांकडून काँग्रेसने देशभक्ती शिकावी, असा सल्ला उत्तर कर्नाटकच्या जामखंडी येथील बागलकोटमध्ये एका निवडणूक प्रचार सभेमध्ये बोलताना दिला.

काय म्हणाले नरेंद्र मोदी ?

‘ज्यांना देशभक्तीच्या नावाने त्रास होतो, जे देशभक्तीच्या चर्चेविरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, अशा सगळ्यांना मी सांगतो की, तुम्हाला दुसऱ्याकडून शिकायचे नसेल तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. परंतु, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा. मला माहीत आहे की, त्यांना (काँग्रेस) खूप अहंकार आहे. देशातील लोकांनी त्यांना नाकारले आहे. त्यामुळे मुधोल कुत्र्यांकडून ते काही शिकतील अशीही मला अपेक्षा नाही’, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर कणखर टीका केली, ते म्हणाले ‘काँग्रेसचा दर्जा इतका खालावलाय की, पक्षाचा एक नेता ‘भारत के टुकडे होंगे’ अशी घोषणाबाजी करणा-यांमध्ये गेला आणि त्यांना समर्थन दिले. जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजीच्या प्रकरणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जेएनयूच्या परिसरात गेले होते. यावरुन मोदींनी राहुल गांधीना लक्ष केले.