मोदींचा राग येत नाही म्हणताच राहुल गांधींच्या कार्यक्रमात मोदी – मोदींच्या घोषणा

पुणे: लोकसभा निवडणुकीला प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. तर मला मोदी यांचा कधीही राग येत नाही, तसेच त्यांना ऐकायला आवडत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

पुण्यामध्ये आयोजित स्टुडंट डायलॉगवेळी गांधी पुण्यात बोलत होते. दरम्यान, राहुल यांनी मोदींबदल वक्तव्य करताच उपस्थित तरुणांनी सभागृहात मोदी – मोदींच्या घोषणा देत त्यांना दाद दिली.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी नोटबंदी, रोजगारसारख्या विषयांवर मोदी सरकारवर टिका केली. आमचा जाहीरनामा हा लोकांच्या मनातील आहे. मला पोकळ गप्पा मारायला आवडत नाही, 72 हजारांचे आश्वासन सर्व अभ्यास करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.