fbpx

भारतात नेत्यांशिवाय सुद्धा अनेक गोष्टी ; मोदींचा माध्यमांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : सध्या माध्यमांमध्ये फक्त राजकारणासंबंधी बातम्या असतात, पण भारतात नेत्यांशिवाय अन्य बऱ्याच गोष्टी आहेत असा सल्ला वजा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना लगवाला आहे. तामिळनाडूमधील एका तामिळ वृत्तपत्राच्या ७५ व्या वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.

त्याचबरोबर, तथ्यहिन लिखाण म्हणजे लेखन स्वातंत्र्य नसून, संपादकीय स्वातंत्र्याचा वापर जनहितासाठी करावा, असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिला आहे. माध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांना विशेष अधिकार आहेत, मात्र या अधिकारांचा गैरवापर करणे हा गुन्हा असल्याचेही त्यांनी सांगितले.