नरेंद्र मोदी दररोज २२ तास काम करतात ; जरा आदर्श घ्या त्यांचा

chandrakant patil

पिंपरी – चिंचवड: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर येथून येऊन पुण्याच्या कोथरूड मतदार संघातून आमदार झालेले असले तरी त्यांनी पुणेकरांना एक सल्ला दिला आहे.पिंपरी – चिंचवड मध्ये आयोजित एका कार्यक्रमात चंद्रकांत दादा म्हणाले की ‘ पुण्यात काही जणांना दुपारी १ ते ४ झोपण्याची सवय असते. या काळात काही काम सांगू नका असं सांगितलं जातं. मोदींकडे बघा ते २२ तास काम करतात.त्यांच्याकडून शिका काहीतरी.असं चंद्रकांतदादा पुणेकरांना म्हणाले आहेत.

एकंदरीत पुणे आणि पुणेकरांचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. याबाबत पुणे खूप प्रसिध्द आहे.मग ते पुणेरी पाट्या असतील पुणेकरांचे उर्मट बोलणे हे सगळे जगप्रसिद्ध आहे.झोपेच्या विषयाबाबतीत तर बोलूच नका म्हणजे तिकड काय व्हायचं ते होऊद्या आम्हाला दुपारी १ ते ४ झोप हवीच.यावरच चंद्रकांत दादांनी उपदेशाचे डोस पाजले आहेत.

विविधं काम करण्यासाठी निवडून यायचं असतं, नाहीतर पाच – सहा वेळेस आमदार होऊन देखील काही उपयोग नाही. टार्गेट आपल्या आयुष्यात ठरवायची असतात. जे लोकांनी दिलं ते काम करण्यासाठी दिलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिकलं पाहिजे. मोदी कधी टीकेची काळजी करत नाहीत. किती ही टीका करा, ते सरळ चालत असतात. अयोध्येमध्ये काही जणांनी टीका केली.

कोरोना आहे ई-भूमिपूजन करा. परंतु मोदी अयोध्येत गेले भूमिपूजन करून परत आले. रात्री झोपताना आपण आज चुकीची गोष्ट केली नाही याचं समाधान असलं पाहीजे.” कार्यक्रमात उपस्थित भाजपा आमदार-कार्यकर्त्यांना पाटील यांनी मार्गदर्शन केलं.

महत्वाच्या बातम्या