नवी दिल्ली : देशात सध्या अग्निपथ योजनामुळे वातावरण प्रचंड तापताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता यावरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
“सलग 8 वर्षे भाजप सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा अवमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना ‘माफिवीर’ बनून देशातील तरुणाईची आज्ञा पाळावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावा लागेल.”, असे राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
8 सालों से लगातार भाजपा सरकार ने ‘जय जवान, जय किसान' के मूल्यों का अपमान किया है।
मैंने पहले भी कहा था कि प्रधानमंत्री जी को काले कृषि कानून वापस लेने पड़ेंगे।
ठीक उसी तरह उन्हें ‘माफ़ीवीर' बनकर देश के युवाओं की बात माननी पड़ेगी और 'अग्निपथ' को वापस लेना ही पड़ेगा।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2022
दरम्यान देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता याविरोधात बिहारने आज बंद पुकारला आहे. बिहारमध्ये आंदोलकांनी १२ रेल्वे जाळल्या असून या योजनेविरोधातील १३ राज्यांत प्रचंड विरोध केला जात आहे. त्यात बिहार आणि तेलंगणध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आता काही विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंद पुकारला असून या बंदला लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीने समर्थन दिले आहे. तसेच बिहारमध्ये काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली असून रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी आज बिहार बंद पुकारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आज देशातील प्रत्येक महिलेने…”, चित्रा वाघ यांचे वक्तव्य
- IND vs SA 4th T20 : मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या कार्तिकनं कोणाला दिलं आपल्या फलंदाजीचं श्रेय? वाचा!
- Agneepath Scheme: ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आज बिहार बंद
- “आम्ही सैनिकांना भाड्याने ठेवू शकत नाही”, ‘अग्निपथ’ योजनेवर भगवंत मान यांची टीका
- मग छातीत कळा नेमक्या कशामुळे?; ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांचा भुजबळांना टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<