fbpx

ठरल तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी लढणार ‘या’ मतदारसंघातून

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील आठवड्यात सुरुवातीला लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. तत्पूर्वी कॉंग्रेसकडून १५ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी तर सोनिया गांधी या रायबरेलीमधून लढणार आहेत.

महागठबंधनकडून पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. तर मोदी हेच एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. २०१४ साली नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमधील वाराणसी आणि होमग्राउंड गुजरातच्या बडोदामधून लढले होते. त्यामुळे यंदा ते कोठून लढणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या संसदीय समितीच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मोदी हे वाराणसीमधून लढणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

2 Comments

Click here to post a comment