fbpx

संविधानाचे रक्षण करणारे नरेंद्र मोदी काँग्रेसला उध्वस्त करतील – रामदास आठवले

ramdas-athawale

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाचे रक्षक आहेत. त्यांच्यावर संविधान उध्वस्त करतील असा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. नरेंद्र मोदी हे संविधानाला नाही तर या देशातून काँग्रेसला उध्वस्त करतील. संविधानाला कोणी उध्वस्त करू शकत नाही. जे संविधान उध्वस्त करण्याचा विचार करतील तेच या देशातून उध्वस्त होतील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला.

आसाम येथील सिलचर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर ते संविधान उध्वस्त करतील अशी टीका केली होती. त्यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदी हे संविधान उध्वस्त करणार नाहीत मात्र कॉंग्रेस पक्षाला नक्की उध्वस्त करतील असा टोला लगावला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगात सर्व श्रेष्ठ संविधान असून ते कोणीही कधीही बदलू शकत नाही. संविधान कोणीही उध्वस्त करु शकत नाहीत जे संविधान उध्वस्त करण्याचा विचार करतील तेच उध्वस्त होतील असा इशारा ना रामदास आठवले यांनी आज दिला.संविधान कोणी बदलू शकत नाही हे त्रिवार सत्य असताना काँग्रेस नेते जनतेत गैरसमज पसरविण्यासाठी चुकीचा खोटा आणि खोडसळ प्रचार करीत आहेत.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाचे संरक्षक आहेत. त्यांच्यावर प्रियांका गांधी यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. असे सांगत नरेंद्र मोदी हे लोकशाहीमार्गाने जनतेच्या मनातून काँग्रेसला उखडून फेकणार असून या देशातून काँग्रेसला उध्वस्त करतील असे रामदास आठवले म्हणाले.