लोकसभा निवडणुकीआधीच पंतप्रधान लागले कामाला ; २० राज्यात घेणार तब्बल १०० सभा

Narendra-Modi-victory

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लोकांनी गाजराची पुंगी मोडल्याचा धडा घेत भाजपने निवडणूक घोषणेपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या निवडणुकांपूर्वी मोदी सभांचा धडाका लावणार आहेत.

Loading...

लोकसभा निवडणुकांची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांना रणांगणात उतरवून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे मनसुबे भाजपने आखले आहेत. त्यासाठी 20 राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 सभांचे आयोजन केले जात आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लोकांनी गाजराची पुंगी मोडल्याचा धडा घेत भाजपने निवडणूक घोषणेपूर्वीच सभा घेण्याचे ठरवले आहे.

या सभांमध्ये पंतप्रधान मोदी सरकारची चार वर्षांतील कामगिरी जनतेपुढे ठेवतील. गुरुवारी पंजाबच्या जालंधर आणि गुरुदासपूरमध्ये पंतप्रधानांची रॅली आणि सभा होणार आहे. ही त्यांची नव्या वर्षातील पहिलीच सभा असली तरी त्याकडे लोकसभेसाठीचे रणशिंग म्हणून पाहिले जात आहे.

या नियोजनात 3 जानेवारी पंजाब येथील गुरुदासपूर आणि जालंधरमध्ये रॅली, 4 रोजी मणिपूर आणि आसाम येथे रॅली, 5 रोजी झारखंड आणि ओडिशात रॅली, 22 रोजी वाराणसीत रॅली, 24 जानेवारी प्रयागराजच्या कुंभमेळ्यात हजेरी राहणार आहे. इतर रॅली आणि सभांच्या तारखा नंतर जाहीर होणार आहेत. 2014 मध्ये हातातून गेलेल्या जागा काबीज करण्याची भाजपची आखणी आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी मोदींच्या शंभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...