fbpx

जनता मोदींच्याच नेतृत्वातील एनडीए सरकारला संधी देणार,आठवलेंनी काढला पवारांना चिमटा

टीम महाराष्ट्र देशा – 2019 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला जनता पुन्हा निवडून देईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार जाणार असल्याच्या व्यक्त केलेल्या भाकीताशी आपण सहमत नसल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांचा वारसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चालवत असून लोकप्रिय सक्षम प्रधानमंत्री ठरले आहेत.देशाच्या विकासासाठी सबका साथ सबका विकास हे मोदींचं सूत्र योग्य ठरले असून त्यानुसार विकासासाठी पुन्हा जनता मोदींच्याच नेतृत्वातील एनडीए सरकारला संधी देणार आहे. देशासमोर एनडीए हाच समर्थ पर्याय आहे. विरोधकांच्या एकजुटीला फुटीचे ग्रहण लागले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात देशाला स्थिर आणि विकसनशील सरकार मिळू शकते असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी

पंतप्रधान पदाचे दावेदार शरद पवारांच्या विरोधात लढायला आवडेल- संजय काकडे

मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये : रामदास आठवले