नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांनी सरदार सरोवर धरण प्रकल्प रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, अशी आठवण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जनतेला करून दिली. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या अरविंद केजरीवाल यांच्यावर केले आहेत.
नरेंद्र मोदी सोमवारी गुजरात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी आपच्या नेतेमंडळींना ‘शहरी नक्षलवादी’ असे संबोधलं आहे. तसेच मला माझ्या आदिवासी बांधवांना विशेष सांगितले पाहिजे की, नक्षलवाद हा (पश्चिम) बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये तसेच ओडिशा, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सुरूवातीच्या टप्प्यात प्रयत्नशील आहे. हे नक्षलवादी आमच्या आदिवासी तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. अशा वेळी राज्यातील आदिवासी लोकांनी माझे म्हणणे ऐकून माझ्यावर विश्वास ठेवला आहे, असे मी समाधानाने सांगू शकतो, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, शहरी नक्षलवादी राज्यात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी धडपड करत असून याचे विविध प्रकारे प्रयत्न सुरू असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. मात्र, आम्ही त्यांना आमची तरुण पिढी नासवू देणार नाही. आपण आपल्या मुलांना ‘शहरी नक्षलवाद्यां’ पासून सावध केले पाहिजे. या लोकांनी देश उद्ध्वस्त केला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | ‘धनुष्यबाण’ गोठलं! परंतू शिवसेनेकडे अगोदर कोणती चिन्हं होती?, जाणून घ्या त्यामागचा इतिहास
- NCP । आधी म्हणाले, काका पुतण्याने मला कोंडून ठेवलं, आता म्हणतात, पवार माझं दैवत; राष्ट्रवादीच्या सूचनेनंतर पाटलांची माघार
- Health Tips | ‘या’ आजारांमुळे वाढू शकते वजन, जाणून घ्या!
- Nobel Prize in Economics | बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांना नोबेल पुरस्कार जाहीर
- Vinayak Raut | “आम्ही दिलेली नावं घेण्याचा प्रयत्न गद्दार पार्टीने केला तरी…”, विनायक राऊत कडाडले