या बाबतीत राहुल गांधी यांनी दिली मोदींना मात

-modi-and-rahul-gandhi

वेब टीम:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून मोठ्याप्रमाणावर टीका केली जात असते .मोदींवरअगदी ‘अनिवासी भारतीय पंतप्रधान’ (एनआरआय पीएम) अशी शेलकी, उपरोधिक टिप्पणी केली जायची.मात्र यावर्षी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी परदेशवारी करण्याच्या बाबतीत नरेंद्र मोदींना मागे टाकले आहे. राहुल गांधी यांनी मोदींना फक्त मागे टाकले नाही, तर त्यांच्यापेक्षा दुप्पट काळ परदेशात व्यतित केला आहे. मोदी २१ दिवस, तर राहुल हे त्यांच्या दुप्पट म्हणजे ४२ दिवस देशाबाहेर राहिले.
यावर्षीच्या दोघांच्या दौऱ्यातील महत्वाच्या बाबी
नरेंद्र मोदी
मोदींनी २१ दिवसांच्या सहा दौरयांमध्ये १२ देशांना भेटी दिल्या.मोदींनी तीन वर्षांमध्ये (२६ मे २०१७पर्यंत) २७ दौरयांमध्ये ४४ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी २७५ कोटींहून अधिक खर्च आला. १०५ दिवस ते देशाबाहेर होते.

राहुल गांधी
यावर्षी राहुल गांधी यांनी तब्बल ४२ दिवसांमध्ये केवळ चारच देशांचे दौरे केले. त्यापैकी नवे वर्ष साजरे करण्यासाठी जानेवारीच्या प्रारंभी केलेल्या युरोप दौऱ्याचा आणि आजीला भेटण्यासाठी इटलीला केलेल्या दौऱ्याचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. याउलट नार्वे आणि नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यामध्ये अधिकृत गाठीभेठी, परिसंवाद, प्रश्नोत्तरेअसा भरगच्च कार्यक्रम होता.महत्वाची बाब म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांमध्ये ७३ दौरे केले आणि ९६ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी ७९५ कोटींहून अधिक खर्च आला होता.

2 Comments

Click here to post a comment