नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा आगामी लोकसभेसाठी ठरणार ऊर्जा देणारा !

सोलापूर : ( सूर्यकांत आसबे )  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. देशभरात राजकीय उलथापालथ होत आहे. राजकीय कोलांटउड्यांना जोर आला आहे. या वादळाला सामोरे जाण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात पुन्हा कमळ फुलविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपासमोर दुसरा पर्याय दिसत नाही.

२०१४ सालच्या मोदी लाटेत देशभरात अनेक खासदार मातब्बरांचा पराभव करून सहज निवडून आले. दरम्यान ज्यामध्ये सोलापूरचे भाजपचे खासदार अभिनेते आणि पेशाने वकील असलेले शरद बनसोडे यांचे नाव आहे.केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव करून शरद बनसोडे खासदार झाले. आज लोकसभा निवडणूक होऊन जवळपास साडेचार वर्षांचा कालावधी लोटत चालला आहे. स्मार्ट सिटीशिवाय सोलापुरात सरकारकडून फारसे विकासाचे कोणतेही काम झालेले दिसत नाही. खासदार शरद बनसोडे येतात कधी आणि जातात कधी हेसुद्धा सोलापूरकरांना कळत नाही. याउलट सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र सातत्याने सोलापूरकरांशी संपर्क ठेवला आहे. बनसोडे यांनी निवडून देऊन आणि सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून चूक झाल्याचा पश्चाताप आता सोलापूरकरांना झाला आहे. तरीपरंतु शरद बनसोडे आपण दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदे यांना अस्मान दाखविण्याची भाषा बोलत आहेत. भाजपचा लोकसभेला लवलेशही नसलेल्या सोलापूरकरांनी मोदी लाटेत शरद बनसोडे यांना निवडून देऊन भाजपाला चक्क शिंगावर घेतले. आणि आता हेच सोलापूरकर भाजपाला कंटाळले आहेत. असे असले तरी निवडणुकीत कोण काय करेल हे सांगता येत नाही.

Loading...

मागील साडेचार वर्षात भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरसाठी ठळक काही काम केले असे दिसत नाही. सोलापूरकर बनसोडे यांच्यावर नाराज आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आपणास कामाला लागण्याचा आदेश दिल्याचे शरद बनसोडे छातीठोकपणे सांगत आहेत. अशातच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी खासदार बनसोडे यांच्यावरील आपला राग काढण्यासाठी राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांना सोलापूर लोकसभेसाठी फ्लॅश करण्यास सुरुवात केल्याने खासदार बनसोडे यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. खासदार साबळे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत असतानाही खासदार बनसोडे मात्र निर्धास्त असल्याचे दिसून येत आहेत. सोलापूरकरांना आता बनसोडे ऐवजी शिंदे असा बदल हवा आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेची भाजपाची जागा राखताना भाजप नेत्यांना आणि दोनही मंत्र्यांना जीवाचे रान करावे लागणार आहे.

सोलापुरातील सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील भांडण सर्वश्रुत आहे. अद्यापही ते मिटलेले नाही. एकमेकांची तोंडसुद्धा न पाहणाऱ्या देशमुखी वादामुळे मनपातील नगरसेवकांच्या दोन्ही गटाला मनस्ताप सहन करावा लागत आहे हेसुद्धा लपून राहिलेले नाही. खासदार शरद बनसोडे यांच्या पाठीशी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत. तर सहकारमंत्री देशमुख यांनी बनसोडे ऐवजी खासदार अमर साबळे यांना पसंती दर्शवल्याने खासदार बनसोडे यांना निवडून आणताना अंतर्गत वादाचा मोठा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापुरात आले होते. होम मैदानावर झालेल्या विराट जाहीर सभेत त्यांनी आश्वासनांची खैरात केली होती. त्यापैकी बरीच आश्वासने पाळलेली नाहीत. शरद बाबू को चुन के लाओ सोलापूरवासियोको बहोत कुछ दे डालुंग असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनिक साध घातली होती.त्याला सोलापूरकर बळी पडले. आता पुन्हा विविध विकास कामाच्या उदघाटनाची येत्या ९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत. मोदी यांचा दौरा सोलापुरातील भाजपाला ऊर्जा देणारा असला तरी जागरूक सोलापूरकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नेमका कोणाचा गेम करतात हे सांगणे कठीण आहे. अंतर्गत वादाने पोकरलेल्या भाजपाला आगामी लोकसभा जितकी वाटते तितकी सोपी नाही हे मात्र निश्चित .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले