नरेंद्र मोदी करणार अमेरिकेचा दौरा; बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलीच भेट

biden-modi

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. ‘क्वाड’ देशांच्या परिषदेत नरेंद्र मोदी सहभागी होणार असून पहिल्यांदाच देशांचे नेते समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुढील आठवड्यात या परिषदेचं आयोजन केलं असून केंद्र सरकारने मोदींच्या उपस्थितीला दुजोरा दिला आहे.

चार देशांच्या क्वाड परिषदेसाठी नरेंद्र मोदी हे 24 सप्टेंबरला अमेरिकेला जाणार आहेत. या बैठकीत मोदी आणि बायडन यांच्यासह जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन हे देखील प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

कोरोना स्थितीचा आढावा, पर्यावरण बदलाची समस्या, भारत-प्रशांत क्षेत्रात मुक्त आणि खुल्या वातावरणासाठी प्रोत्साहन, तसंच तंत्रज्ञान आणि सायबर स्पेस या मुद्द्यांवर क्वाड परिषदेत चर्चा होणार आहे. या वर्षी मार्च महिन्यात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून क्वाड देशांची बैठक झाली होती. या बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीचाही आढावा येत्या बैठकीत घेतला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या