मुंबई: पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत.@BJP4Maharashtra pic.twitter.com/N6PSuXgQrn
— NCP (@NCPspeaks) June 17, 2022
मोदी सरकार सत्तेत येऊन आठ वर्ष झाली आहेत. या आठ वर्षात मोदी सरकारने आणलेल्या सर्व मोठ्या योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. CAA, कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभर हिंसक आंदोलने होत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर चालले. ७०० हून अधिक शेतकरी यामध्ये मृत्यूमुखी पडले. आता अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा संतप्त सवालही राष्ट्रवादीने केला आहे.
जनतेचा रोष असाच वाढत राहिल्यास ज्याप्रमाणे या देशाने मोदींची एकही मोठी योजना स्वीकारली नाही, त्याप्रमाणे आता २०२४ ला देशाची जनता मोदींना देखील स्वीकारणार नाही. देशातील वाढत्या महागाईचे नवनवे झटके सर्वसामान्यांना सध्या बसत आहेत. जोर का झटका धीरे से देण्याचे तंत्र केंद्र सरकारने जाणीवपूर्वक अवलंबले आहे. त्यामुळे ठराविक दिवसांच्या अंतराने विविध गोष्टींची दरवाढ होताना दिसते. असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ध्वनी प्रदूषणाची समस्या; सुप्रिया सुळेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी
- IND vs SA 4th t20 : भारताचं दमदार कमबॅक..! दक्षिण आफ्रिकेला ८२ धावांनी हरवत मालिकेत साधली बरोबरी
- IND vs SA 4th T20 : वय फक्त आकडाच..! तब्बल १६ वर्षानंतर कार्तिकनं ठोकलं पहिलं अर्धशतक; वाचा!
- IND vs SA : भुवनेश्वर कुमार ‘हा’ विश्वविक्रम मोडण्यापासून एक पाऊल दूर, वाचा!
- IND vs SA 4th T20 : कार्तिकच्या तुफान बॅटिंगमुळं भारताचं आफ्रिकेला १७० धावांचं आव्हान!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<