fbpx

नरेंद्र मोदीजी, बँकांना सांगा पैसे परत घ्या- विजय माल्ल्या

टीम महाराष्ट्र देशा – ब्रिटिश सरकारने माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिल्यानंतर त्याची चांगलीच भंबेरी उडालेली दिसत आहे. भारतातील बँकांचे 9 हजार कोटीं रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला फरार झालेल्या विजय माल्ल्याचे चांगेच धाबे दणाणले आहेत. गुरुवारी विजय माल्ल्याने ट्विट करून बँकांना उरलेले पैसे परत घेण्याचे आवाहन केले आहे.

१६व्या लोकसभेतील पंतप्रधान मोदींच्या शेवटच्या भाषणानंतर माल्ल्याने हे ट्विट केले आहे. ब्रिटिश सरकारने माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिल्यानंतर त्याची चांगलीच भंबेरी उडालेली दिसत आहे. त्यामुळे एकामागून एक ट्विट करून माल्ल्याने हिंदुस्थानच्या सरकारला पैसे परत घेण्याचे आवाहन केले आहे.

विजय माल्ल्याने ट्विट करून स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ‘आपण उर्वरीत रक्कम परत करण्याची ऑफर कर्नाटक उच्च न्यायालयासमोर ठेवली आहे. ती तूम्ही धुडकावू शकत नाही’, ही पुर्णपणे वास्तविक, गंभीर आणि इमानदारीने दिलेली ऑफर असल्याचे माल्ल्याने म्हटले आहे.