अब की बार ट्रम्प सरकार, मोदींची अमेरिकेत घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. मोदी ह्युस्टमध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भाषण केले. यावेळी दोघांनीही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या कार्यक्रमासाठी 50 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांची उपस्थिती होती.

यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना मोदींनी ‘अब की बार ट्रम्प सरकार’ म्हणत ट्रम्प यांना पुन्हा एकदा निवडूण देण्याचे आव्हान केले. यासोबतच नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांनी दहशदवारावरही भाष्य केले. पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान यांनी एकत्र सभा घेतली. यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरली आहे.

नरेंद्र मोदींनी दहशतवादावर भाष्य करताना दहशतवादाला पोसणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे ते म्हणाले. यासोबतच दहशतवादाविरोधातील लढाईत ट्रम्प हे आमच्या सोबत आहे. यामुळे दहशदवादी कृत्ये कराल तर याद राखा असा सूचक इशाराच त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. मोदी आणि ट्रम्प दहशतवादाविरोधात एकत्र आल्याने पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.

दरम्यान पुढे बोलताना मोदी यांनी ‘काही लोकांना आपला देश सांभाळता येत नाही मात्र ते भारताच्या अंतर्गत मुद्यावर भाष्य करतात. राजकारण करण्यासाठी काही मंडळी दहशतवाद्यांना पोसत आहेत. अमेरिका किंवा भारतात जे दहशतवादी हल्ले झाले त्यासाठी दहशतवाद्यांना कोण खतपाणी घालतं ते सर्वांना माहिती आहे असं म्हणत इमरान खान यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या