विशेष मुलाखत : मोदींच्या मुलाखतीतून सुरु होणार २०१९ चा ‘रणसंग्राम’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी यांनी मुलाखतीने केली आहे. मोदींनी ANI या आघाडीच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केल आहे. या मुलाखती मध्ये त्यांनी राममंदिर, सर्जिकल स्ट्राईक अशा अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.

देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना या निवडणुकींत काय मुद्दे असणार याकडे देशाच लक्ष आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धमाका करणार असून लोकसभा निवडणुकीत काय मुद्दे असणार याची झलक देणार आहेत.

देशाच्या मनात असलेल्या अनेक प्रशांना पंतप्रधान मोदी आज उत्तर देणार असल्याने सगळ्या देशाचे लक्ष मोदींच्या या अक्शन पॅक मुलाखातीकडे लागले आहे.