माझ्याबद्दल अपशब्द काढा पण सरदार पटेलांबाबत भाष्य नको : मोदी

टीम महाराष्ट्र देशा- काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीवरुन केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले तरी हरकत नाही. पण आपल्या वक्तव्यांमुळे त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान व्यक्तीची उंची कमी करु नये अशा शब्दांत राहुल गांधी यांना सुनावलं आहे.पंतप्रधान मोदी यांनी राजकोट जिल्ह्यात महात्मा गांधी संग्रहालयासह विविध योजनांचे लोकार्पण केले. संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं होतं ?
मोदीजी भलेही सरदार पटेल यांचा मोठा पुतळा बनवत असले तरी आपल्या बूट आणि शर्टप्रमाणे तेही ‘मेड इन चायना’असल्याची टीका त्यांनी केली होती. मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन केले होते. पण ते आता गुजरातच्या लोकांनाच काम देत असल्याचे म्हटले होते.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
राहुल यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले तरी हरकत नाही. पण आपल्या वक्तव्यांमुळे त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान व्यक्तीची उंची कमी करु नये.