अय्यर तुम्ही पाकिस्तानात माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय ?

टीम महाराष्ट्र देशा: नरेंद्र मोदी यांना नीच म्हणून तोंडघाशी पडलेले कॉंग्रेसचे बडतर्फ नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आज जोरदार टीका केली मी पंतप्रधान झाल्यानंतर हेच मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते. मला पंतप्रधान पदावरून हटविण्यासाठी पाकिस्तानी नेत्यांशी त्यांनी चर्चा देखील केली,’ असा आरोप करतानाच ‘अय्यर तुम्ही पाकिस्तानात माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय?’ असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.

Loading...

भाभर येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी हा सवाल केला. मी सत्तेत येताच अय्यर पाकिस्तानात गेले आणि त्यांनी पाक नेत्यांशी चर्चा केली. मोदी सत्तेत आलेत त्यांना हटविले नाही तर भारत-पाक संबंध कधीच सुधारणार नसल्याचं त्यांनी पाक नेत्यांना सांगितलं. पाकिस्तानात जाऊन तुम्ही मला हटविण्याची भाषा करत होतात. तिथे काय तुम्ही माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय? असा सवाल मोदींनी केला.Loading…


Loading…

Loading...