भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी षड्यंत्र केल; मात्र नागरिकांनी त्यांना नाकारलं- मोदी

टीम महाराष्ट्र देशा: मी गुजरात सोडून दिल्लीत गेल्याने काही लोकांना आम्ही निवडणुकांत पराभूत होणार असल्याच वाटायचं, मात्र माझ्यानंतर गुजरातमधील कार्यकर्त्यांनी विकासाला ब्रेक लागू दिला नाही त्यामुळेच आम्ही विजयी झाल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. गुजरातच्या विजयानंतर भाजप ऑफिसमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल. गुजरातमध्ये काही लोकांनी जातीयवादाच विष पेरण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्यांना नाकारलं म्हणत मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

गुजरातचा विजय माझा आनंद द्विगुणित करणारा आहे. एखादी पार्टी सतत २२ वर्षे सत्तेत राहूनही निवडणून येते ही देशाच्या इतिहासात अभूतपूर्व घटना आहे. तसेच विरोधकांनी केवळ एक वेळ आम्हाला हरवता याव यासाठी षड्यंत्र केल्याची टीका मोदी यांनी यावेळी केली. तसेच भाजपच्या सबका साथ सबका विकास धोरणावर शिक्कामोर्तब झाल्याचही ते सांगायला विसरले नाहीत.