नरेंद्र मोदींनी समस्त डॉक्टर मंडळींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले- शिवसेना

narendr modi-uddhav thakare

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्यात एका कार्यक्रमात मोदी यांनी जे उत्तर दिले त्यातून हिंदुस्थानातील डॉक्टरांच्या व्यावसायिक नीतिमत्तेवर आणि प्रामाणिकपणावर शिंतोडे उडाले. वास्तविक मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता ‘मोदी केअर’ या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत. या योजनेचा हिंदुस्थानच्या आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रावर काय प्रभाव पडेल, असे त्यांना विचारले गेले. या प्रश्नाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी भाष्य करणे अपेक्षित होते. मात्र ते करीत असताना पंतप्रधानांनी हिंदुस्थानातील समस्त डॉक्टर मंडळींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अशी टीका शिवसेने केली आहे.

वाचा सामनाचा अग्रलेख ‘लंडनमधील औचित्यभंग’

Loading...

वैद्यक क्षेत्रातील गैरप्रकार हा एक वेगळा विषय आहे आणि त्यासाठी सरसकट सगळय़ा डॉक्टर मंडळींना जबाबदार धरण्याचे कारण नाही. पुन्हा हे जे काही ‘नेक्सस’ वगैरे पंतप्रधान म्हणाले ते कोणत्या क्षेत्रात नाही? ते सर्वत्र आहे. अर्थात याचा अर्थ ते योग्य आहे किंवा मान्य करायला हवे असे नाही. किंबहुना ‘नेक्सस’ किंवा लागेबांधे कुठलेही आणि कोणाचेही असोत, ते मोडूनच काढायला हवेत. प्रश्न फक्त औचित्याचा आहे. लंडनच्या भूमीवरून हिंदुस्थानी डॉक्टरांवर ‘नेक्सस’बाण सोडणे आणि समस्त डॉक्टरवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा औचित्याचा भंग नक्कीच म्हणता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचा नेहमीच गवगवा केला जातो. आपल्या पंतप्रधानांनी परकीय भूमीवर राष्ट्रवादाची, प्रखर राष्ट्रीय अभिमानाची पताका कशी फडकविली अशा आशयाचे ढोल त्यांच्या पक्षाचे सोशल मीडियातील बॅण्ड पथक जोरात बडवत असते. मात्र आपल्या सरकारचा आणि कामाचा डंका वाजविण्याच्या नादात मोदींकडूनच परदेशातील भाषणात हिंदुस्थान, येथील समाज घटक, विरोधी पक्ष आणि टीकाकार यांच्याबाबत कशी हेटाळणी होते हेदेखील अनेकदा दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्यात एका कार्यक्रमात मोदी यांनी जे उत्तर दिले त्यातून हिंदुस्थानातील डॉक्टरांच्या व्यावसायिक नीतिमत्तेवर आणि प्रामाणिकपणावर शिंतोडे उडाले. वास्तविक मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता ‘मोदी केअर’ या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत. या योजनेचा हिंदुस्थानच्या आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रावर काय प्रभाव पडेल, असे त्यांना विचारले गेले. या प्रश्नाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी भाष्य करणे अपेक्षित होते. मात्र ते करीत असताना पंतप्रधानांनी हिंदुस्थानातील समस्त डॉक्टर मंडळींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आरोग्य सेवा सामान्य जनतेला परवडेल या दृष्टिकोनातून आपले सरकार कसे काम करीत आहे हे

सांगण्याच्या नादात

त्यांनी हिंदुस्थानातील डॉक्टर आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांचे ‘नेक्सस’, म्हणजे लागेबांधे आहेत असे सांगितले. वास्तविक लंडनच्या भूमीवर हिंदुस्थानी डॉक्टर समुदायाबाबत असा ‘संशयाचा भोवरा’ निर्माण करण्याची काहीच गरज नव्हती. पंतप्रधानांनी कोणाचे नाव घेतले नाही किंवा ते मोघम बोलले असा युक्तिवाद कदाचित यासंदर्भात केला जाईल, पण पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने देशात किंवा परदेशात कोणत्याही विषयावर किंवा समाज घटकासंदर्भात ‘स्वैर’पणे बोलणे अपेक्षित नसते. लंडनच्या भूमीवरून हिंदुस्थानी डॉक्टर ‘भ्रष्ट’ आहेत हे सांगून पंतप्रधानांना नेमके काय सुचवायचे होते? खरे तर आपल्या देशातील अनेक तज्ञ आणि प्रथितयश डॉक्टरांनी जगभरात हिंदुस्थानचे नाव गाजवले आहे, गाजवत आहेत. इतर देशांमधून रुग्ण हिंदुस्थानात उपचार घेण्यासाठी येतात ते फक्त येथील सुसज्ज इस्पितळे बघून नव्हे, तर येथील डॉक्टरांच्या ‘हाताला गुण’ आहे म्हणून. मात्र त्यांचेच हात भ्रष्ट व्यवहारात, अनीतीमध्ये बरबटलेले आहेत, असे सांगून त्यांच्या प्रामाणिकपणावर पंतप्रधानांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर काय बोलायचे? खरे म्हणजे वैद्यक क्षेत्रातील गैरप्रकार हा एक वेगळा विषय आहे आणि त्यासाठी सरसकट सगळय़ा डॉक्टर मंडळींना जबाबदार धरण्याचे कारण नाही. पुन्हा हे जे काही

‘नेक्सस’ वगैरे

पंतप्रधान म्हणाले ते कोणत्या क्षेत्रात नाही? भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट उद्योगपती यांचेही नेक्सस आहेच. विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांच्यासारखे घोटाळेबाज उद्योगपती आणि राजकारणी यांचेही ‘नेक्सस’ होते. म्हणूनच ते आधी बँका लुटू शकले आणि नंतर परदेशात सुरक्षितपणे पळून जाऊ शकले! बँकांना २६०० कोटींचा चुना लावणारे गुजरातच्या हिरे व्यवसायातील भटनागर कुटुंब आणि भारतीय जनता पक्ष यांचे ‘नेक्सस’ असल्याचा आरोप तर जाहीरपणे केला जात आहे. भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये जे ‘प्रचंड’ यश मिळाले ते मतदान यंत्रांशी असलेल्या ‘नेक्सस’मुळे असे आक्षेपही घेतले गेलेच. भाजपची तिजोरी एक हजार कोटींनी भरली त्यासाठी ‘सत्तेचे नेक्सस’ कारणीभूत असल्याच्या शंकाही उघडपणे घेतल्या गेल्या. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या ‘नेक्सस’बद्दल तर न बोललेलेच बरे. तेव्हा ‘नेक्सस’ कुठे नाही? कोणत्या देशात नाही? कुठल्या क्षेत्रात नाही? ते सर्वत्र आहे. अर्थात याचा अर्थ ते योग्य आहे किंवा मान्य करायला हवे असे नाही. किंबहुना ‘नेक्सस’ किंवा लागेबांधे कुठलेही आणि कोणाचेही असोत, ते मोडूनच काढायला हवेत. प्रश्न फक्त औचित्याचा आहे. लंडनच्या भूमीवरून हिंदुस्थानी डॉक्टरांवर ‘नेक्सस’बाण सोडणे आणि समस्त डॉक्टरवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा औचित्याचा भंग नक्कीच म्हणता येईल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी