‘भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ पुत्राच्या चरणी जयंतीनिमित्त नतमस्तक’

मुंबई : राज्यभरात आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तारखेनुसार) आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्सहाने साजरी होत आहे.राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र भवनमध्येही शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यांसह शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Loading...

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी महाराजांना नमन केले आहे. ‘महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!’ असे मराठीमध्ये टि्वट त्यांनी केले आहे.’धैर्याचं प्रतिक, करुणा, उत्तम प्रशासक आणि विलक्षण अशा भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ पुत्राच्या चरणी जयंतीनिमित्त नतमस्तक. छत्रपती शिवाजी महाराज लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील’. शिवाजी महाराज हे योद्धे आणि उत्तम प्रशासक होते. सामर्थशाली आरमार त्यांनी उभारलं. लोकहिताची अनेक कामं त्यांनी केली. सर्वच क्षेत्रात महाराज निपूण होते. अन्याय आणि भीती उत्पन्न करणाऱ्यांना विरोध करण्यासाठी महाराज कायम स्मरणात राहतील’, असे ट्विट मोदींनी केले आहे.

दरम्यान,भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील ट्विट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर ‘प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा’, असे ट्विट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जयंतीनिमित्त केलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात