fbpx

शरद पवार दुसऱ्याचा बळी देतात, स्वत:च्या कुटुंबियांना ओरखडाही उमटू देत नाहीत – मोदी

माढा : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जाहीर सभेच आयोजन माढा लोकसभा मतदारसंघात करण्यात आले आहे, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे, शरद पवार हे वाऱ्याची हवा ओळखतात, त्यामुळेच त्यांनी माढ्यातून माघार घेतली, दुसऱ्याचा बळी गेला तरी चालेल पण ते स्वत:च्या कुटुंबियांवर ओरखडाही येऊ देत नाहीत, असा घणाघात मोदींनी केला आहे.

शरद पवार यांनी माझे कुटुंब नाही असे म्हणत माझ्यावर  हल्ला केला.  परिवाराविषयी पवारांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार आहे, ते त्यांच्या संस्कारानुसार बोलतात. मी आज जे जगतोय ते अनेक परिवारांकडून प्रेरणा घेवून काम करत आहे, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे परिवार होते, हेच परिवार माझे मार्गदर्शक आहेत. पण दिल्लीतील खास परिवाराचं पवारांचे मॉडेल आहे, असा टोला यावेळी मोदींनी लगावला आहे.

शरद पवारांना शेतकऱ्यांची काही काळजी नव्हती, त्यांनी केवळ आपली साखर कारखान्याची दुकानदारी चालवण्यात धन्यता मानली, मात्र मागील चार वर्षात आम्ही शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी काम केले, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. २३ मे रोजी पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यावर पाण्यासाठी जलशक्ती मंत्रालय निर्माण करण्यात येईल, हे मंत्रालय देशातील प्रत्येक भागामध्ये पोहचवण्यासाठी कामा करेल, असे आश्वासन मोदींनी दिले आहे.

विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर, मोदींच्या हस्ते जाहीर सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडलेल्या जाहीर सभा सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंचावर उपस्थित लावली आहे, त्यामुळे विजयदादांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोलले जात आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती, मात्र विजयदादांनी भाजप प्रवेश न करता भाजपला सहकार्याची भूमिका घेतली होती. अखेर आज त्यांनी अकलूजमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर उपस्थित लावली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.