प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :  पंढरपूरची वारी ही एक अदभुत वारी आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. ते आज आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये बोलतं होते. हा पंतप्रधानांचा ४६ वा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमात कोल्हापूरच्या एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी पंढरपूरच्या वारीवर भाष्य केलं. पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा आहे असं ते म्हणाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनी देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या विचारांमुळे अंधश्रद्धेविरुद्धच्या लढाईला बळ मिळत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार : फडणवीस

ही जादूची झप्पी नाही तर मोदींसाठी मोठा धक्का आहे – संजय राऊत