fbpx

दलालांचे मित्र चौकीदाराला घाबरवत आहेत, नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

सोलापूर: दलालांचे मित्र असणारे लोक आज चौकीदाराला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा चौकीदार ना झोपतो न भितो त्यामुळे दलालांचे मित्र यशस्वी होणार नाहीत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरमध्ये विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले आहे, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

ऑगस्टा वेस्टलॅड प्रकरणावरून मोदी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. विरोधक कितीही खोट बोलले, मला शिव्या दिल्या तरी भ्रष्ट्राचाराचे सफाई अभियान मी सुरूच ठेवणार आहे. हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात भारतात आणण्यात आलेला दलाला हा केवळ एकाच प्रकरणात नाही, तर तत्कालीन सरकारच्या काळात फ्रान्ससोबत विमाने खरेदीच्या जोर सौदा केला जात होता, त्यातही दलालाचा सहभाग होता. असा आरोप मोदी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल सी विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा शरद बनसोडे तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, देशातील कोणतेही पंतप्रधान तीन वेळा सोलापूरला आले नाहीत, मात्र नरेंद्र मोदी हे आजवर तीनवेळा सोलापूरला आले आहेत. आज मोदींच्या प्रयत्नामुळेच सोलापूरला हजारो कोटींची विकासकामे सुरु होत आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात विकासकामे होत आहेत. गरिबांकरता ३० हजार घरे तयार केली जात असल्याने सर्वाधिक आनंद होत आहे. हा प्रकल्प निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी एका मिनिटात परवानगी दिली. पालकमंत्री आणि सहकारमंत्री देशमुख यांनी सर्वाना घरे देण्याचा संकल्प केला आहे. अनेकवेळा भूमिपूजन होत पण उदघाटन होवू शकत नाही. मात्र ज्या रस्त्यांचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले होते त्याच रस्त्याचे उदघाटन होत असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

1 Comment

Click here to post a comment