मोदींचा ‘तो’ व्हिडीओ बनवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून तब्बल ३५ लाख रुपयांचा खर्च?

नवी दिल्ली : २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान मोदींचा योगासन करत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विविध प्रतिक्रिया आल्या. तर काहींनी माजी पंतप्रधान पंडीत नेहरु यांचा शिर्षासन करतानाचा जुना ब्लॅक अॅंड व्हाइट फोटो काढून त्या फोटोसोबतही तुलना केली.

देशातील प्रमुख प्रसार माध्यमांमध्येही हा व्हिडीओ बऱ्याच वेळा दाखवला मात्र, शनिवारी scoops.indiascoops.com या संकेतस्थळाने मोदींच्या योगासनाच्या व्हिडीओबाबत एक बातमी प्रकाशित केली. यामध्ये हा व्हिडीओ बनवण्यासाठी आलेला खर्च अंदाजे सांगण्यात आला आहे. त्या व्हिडीओसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले, तसंच आंतरराष्ट्रीय योगदिनी जाहिरात आणि इतर गोष्टींसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा या सबंधित बातम्यांमध्ये आला आहे.

हे वृत्त प्रकाशित होताच काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी या संकेतस्थळाच्या आधारे ट्विट करत केंद्र सरकारवर निशाना साधला. शशी थरुर यांनी ट्विट करुन, योगदिनी जाहिरातींवर २० कोटी रुपये खर्च आणि मोदींच्या फिटनेस व्हिडीओसाठी ३५ लाख रुपये खर्च केला, हे लाजिरवाणं आहे. हे सरकार केवळ दिखावा करणारं सरकार आहे’ असं म्हणत सरकारवर टीका केली.

बँकांनी केली मंत्र्यासोबत ‘सेटलमेंट’; संभाजी निलंगेकरांचं 76 कोटींचं कर्ज 25 कोटीत सेटल

घ्या आता ! मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात वापरले प्लास्टिकचे ग्लास

You might also like
Comments
Loading...