सवर्णांना आरक्षण ही विरोधकांना चपराक : मोदी

सोलापूर : ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात आतापर्यंत खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल केली जात होती. सामान्य वर्गातील गरिबांना आरक्षण देण्यासाठी हे सरकार दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या कोट्यातून काढून घेणार असा प्रचार केला गेला. मात्र, गरीब सवर्णांना १० टक्क्याचं अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेत आम्ही खोटा प्रचार करणाऱ्यांना चपराक लगावली आहे’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल सी विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा शरद बनसोडे तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.

गरीब सवर्णांसाठी १० टक्क्यांच्या आरक्षणाच्या आमच्या या निर्णयामुळं खोटं पसरवणाऱ्यांना आम्ही असा काही धक्का दिला आहे की, खोटं पसरवण्याची त्यांची ताकदच नष्ट होऊन जाईल’, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केली.

You might also like
Comments
Loading...