पंतप्रधान मोदींनी केली म्यानमार संबंधात ‘हि’ महत्वाची घोषणा

म्यानमार दौऱ्यात पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या चीन-म्यानमारच्या दौऱ्यावर आहेत . बुधवारी सकाळी मोदींनी म्यानमारच्या राज्य सल्लागार आंग सान सु की यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांतमध्ये 7 समझौता करार करण्यात आले .2017-2020 या कालावधी सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमाची घोषणा देखील करण्यात आली आहे,

भारत आणि म्यानमारमध्ये समान सुरक्षा समस्या आहेत आणि त्या सोडवण्या करता दोन्ही देशांनी एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. म्यानमारमध्ये एकता आणि क्षेत्रीय एकात्मतेचा आदर केला जातो. म्यानमारमधील ज्या नागरीकांना भारतात येण्याची इच्छा आहे त्या नागरिकांना मोफत व्हिसा देण्यात येणार असल्याचं या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले, तर या बरोबरच भारतीय तुरुंगातील चाळीस म्यानमार नागरिकांना सोडण्यात येईल. असे आश्वासन मोदीनी दिले आहे.