न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यात मोदी आघाडीवर : सुशीलकुमार शिंदे

sushilkumar shinde

सोलापूर : काँग्रेस सरकारने विकासाच्या अनेक योजना आणल्या होत्या. पण आम्हाला त्याची कधी जाहिरातबाजी करता आले नाही. याच्या अगदी उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच सुरू आहे. न केलेल्या कामांचे उद्घाटन करत ते श्रेय लाटतात, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. अक्कलकोट येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्याचबरोबर भाजपच्या स्थानिक नेत्यांना देखील त्यांनी लक्ष केले.

न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची परंपरा भाजपात आहेच आणि ती वरपासून पाळली जाते असा टोलाही शिंदेंनी लगावला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशावरही भाष्य केले होते. राजकारणात सक्रिय झाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ काँग्रेस पक्षालाच होऊ शकेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे.