fbpx

पराभवानंतरही माजी खासदारांना सरकारी बंगले सोडवेना, आता वीज, पाणी जोडणी कापण्याचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देखील २०० माजी खासदारांनी अजूनही सरकारी बंगले सोडलेले नाहीत. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून सर्व माजी खासदारांना सरकारी निवासस्थाने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात दिवसांत निवास न सोडल्यास वीज आणि पाण्याची जोडणी कापण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सत्ताधारी भाजपसह इतर पक्षातील दोनशे खासदारांनी निवडणुक होऊन दोन महिने उलटले तरीही शासकीय घरे खाली केलेली नाहीत. नव्याने निवडून आलेल्या खासदारांना दिल्लीत राहण्याची अडचण होत आहे. त्यामुळे खुद्द पंतप्रधान कार्यालयालाच दखल घ्यावी लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटकरत माजी खासदारांची कानउघडनी केली आहे. संसदेच नवीन सत्र सुरु होत असताना नव्याने निवडून आलेल्या खासदारांना घरे शोधताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खासदार झाल्यावर मतदारसंघातून आलेल्या काही लोकांच्या भेटीगाठी आणि निवासाचीही व्यवस्था करावी लागते. त्यामुळे या समस्या दूर करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आनंद आहे, असं मोदी यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या