महामुलाखत: नरेंद्र मोदी हे तुमचे शिष्य आहेत पण ते तुमच ऐकतात का?

राज ठाकरेंचा पवारांना प्रश्न

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत राज ठाकरे हे पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर घेतली. त्यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे तुमचे शिष्य आहेत पण ते तुमच ऐकतात का ? असा प्रश्न उपस्थित केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांची अभूतपूर्व मुलाखत घेत आहेत. राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले, मी देशाचा कृषिमंत्री असताना गुजरातमध्ये शेतीबदल चांगलं काम होत.

मात्र दिल्लीत मुख्यमंत्र्यांची बैठक असली की ते तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर व्यक्तिगत टीका करायचे. ह्याचा परिणाम म्हणजे गुजरातबदल काय विषय आला की तेव्हाचे काँग्रेसमंत्री विचार करायचे. मात्र मी मोदींची भूमिका काहीही असली तरी गुजरात हा देशाचा भाग आहे म्हणून मी योजना देत होतो. यावरूनच त्यांनी दिल्लीत आल्यावर तसे वाक्य वापरले. मात्र त्याला काही अर्थ नाही.