‘नरेंद्र मोदी हे देशाचे सगळ्यात मोठे नेते’; संजय राऊतांनी केलं मोदींच तोंडभरून कौतुक

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्य्यांसह राज्यातील इतर प्रश्नांवरून या भेटीमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर चर्चा रंगली ते मोदी-ठाकरेंच्या एकांतात भेटीची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्वतः पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुमारे ३० मिनिटे या दोन्ही नेत्यांची वैयक्तिक भेट झाल्याचे समोर आले.

या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नच उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. यामुळे ट्विटरवर देखील जोरदार चर्चा सुरु झाल्या असून काही मेम्स व्हायरल होत आहेत.

‘नरेंद्र मोदी हे भाजपचे आणि देशाचे सगळ्यात मोठे नेते आहेत, असं मी आजही मानतो. गेल्या सात वर्षात भाजपला जे यश प्राप्त झालंय ते नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळेच झालंय हे नाकारता येणार नाही. मोदी हे देशाचे नेते आहेत. ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाला वाटतं की त्यांचा चेहरा प्रत्येक निवडणुकीला वापरला पाहिजे. प्रत्येक निवडणूक पंतप्रधानांच्या नावावर जिंकावी. अटलबिहारी वाजपेयी यांचाही फोटो सगळीकडे वापरला जायचा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा आणि फोटो कार्यकर्ते निवडणुकांमध्ये वापरत असतात. पक्षाने आदेश काढला तरी चेहरा वापरणं थांबत नाही,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP