fbpx

नरेंद्र मोदी म्हणजे आयपीएल टीमचे कॅप्टन, मी धावा काढणारा बॅट्समन : आठवले

ramdas aathvale

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयपीएलच्या कॅप्टनप्रमाणे असून मी चांगला फलंदाज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाचा काहीही फायदा होणार नसून २०१९ मध्ये भाजपाचीच सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले आठवले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी असल्याचा खोटा प्रचार करून काँग्रेस 2019 मध्ये सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे धडाधड रन्स बनवणाऱ्या आयपीएलमधील टीमच्या कॅप्टन सारखे आहेत आणि मी त्यांच्या संघातील बॅट्समन आहे. त्यामुळे राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केले तरी 2019 ची मॅच आम्हीच जिंकु .