fbpx

राफेलमध्ये अडकल्यामुळेच नरेंद्र मोदी गप्प : शिंदे

sushilkumar shinde

सोलापूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावर संसदेत भूमिका मांडली असून या राफेल प्रकरणामध्ये भाजप पूर्णपणे अडकली आहे. या राफेलमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या राष्ट्रीय प्रश्नावर देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची गरज आहे. मात्र ते बोलत नाहीत. राफेल प्रकरणावर पंतप्रधान घाबरलेले आहेत. म्हणून ते बोलत नाहीत , राफेलमध्ये अडकल्यामुळेच मोदी गप्प आहेत अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. उद्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे, या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशात जातीयवाद आणि धर्मवाद वाढला असून त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील महाआघाडीने एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केले .
शिंदे म्हणाले, मोदी फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच करत नाहीत. भारताची परिस्थिती नाजूक आहे. नोटबंदीमुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. नोटा बदलण्यासाठी रांगेत उभारलेल्या १२२ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण . किती नोटा छापल्या आणि किती नष्ट केल्या याचा हिशोब कोण देणार . दरवर्षी २ कोटी नौकऱ्या देणार असल्याचे सांगणारे मोदी यांनी किती जणांना नोकऱ्या दिल्या उलट अडीच कोटी नौकऱ्या लोक गमावून बसले असे सांगत जोरात भाषणे करायची आणि खोटी अश्वासने देण्यात मोदी पटाईत आहेत. मोदी पुड्या सोडण्यात प्रसिद्ध आहेत. असा टोला शिंदे यांनी लगावला. मोदी हे सीबीआय व कॅगवर दबाव आणत आहेत. मोदींनी राजीनामा दिला पाहिजे असेही शिंदे म्हणाले.
सोलापूर हे माझं शहर आहे. या शहरात मी भरपूर कामे केली आहेत. आपण सुरु केलेली अनेक कामे आज पूर्णत्वास येत आहेत. अशाच मी केलेल्या कामाचे उदघाटन करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात येत आहेत, हि सोलापूरकरांच्या दृष्टीने चांगली गोष्ठ आहे, असा उपरोधिक टोला सोलापूरचे सुपुत्र आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. यापूर्वी मोदींनी शिर्डी येथे कार्यक्रमात सोलापुरी जॅकेट वापरत असल्याची पुडी सोडली होती. प्रत्यक्षात सोलापुरात तशी जॅकेट बनत नाहीत, असे सांगून शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असल्याचे दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सोलापुरात आले होते त्यावेळी त्यांनी सैनिकांसाठी सोलापूरचे पोवारलूमवर तयार होणारे कापड गणवेशाची वापरणार असल्याचे सांगत सोलापूरकराची माने जिंकली होती, परंतु मोदी यांनी पावणेपाच वर्षात एक मीटरतरी कापड खरेदी केले काय ? सोलापूरच्या टेक्स्टाईल हबचे काय झाले असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
दरम्यान मध्यंतरी एका कार्यक्रमात मोदींनी मी सोलापूरचे जॅकेट घातले आहे, असे म्हंटले होते. त्यांच्या त्या विधानाची चौकशी सोलापूरमध्ये केल्यावर अशा प्रकारचे जॅकेट सोलापुरात बनत नाही, असे समजले . यातून पुन्हा मोदी यांनी पुडी सोडल्याचे स्पष्ठ झाले आहे, अशी टीकाही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.
केंद्रात सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजपकडून अनेक आश्वासने देण्यात आली होती. त्यातील कोणत्याही प्रकारची आश्वासने पूर्ण करण्यात या सरकारला पूर्णपणे अपयश आल्याचे शिंदे यांनी सांगितले . त्याचा राग नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीतून जनतेने दाखवला आहे. याचे परिणाम भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत नक्कीच दिसतील, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप शिवसेना यांची युती होईल का प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, पंढरपुरात उद्धव ठाकरे यांनी मोठी सभा घेतली आणि आता पंतप्रधान मोदी हे सोलापुरात छोटी सभा घेत आहेत, यावरून बरेच चित्र स्पष्ट होते असे ते म्हणाले. काँग्रेस आगामी निवडणूका सर्वधर्मसमभाव मुद्यांवर तसेच युवक आणि शेतकरी विषयावर लढविणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेतकरी, मजूर,विध्यार्थी,शिक्षक,अंगणवाडी सेविकामध्ये मोदी यांच्याविषयी प्रचंड चीड असल्याचे शिंदे म्हणाले. पाहिले मंदिर फार सरकार याबाबत छेडले असता शिंदे म्हणाले, शिवसेना प्रथम खुर्चीवर बसेल कि पाहिले मंदिर येणार काळच ठरवेल. भाजप शेतकऱ्याच्या जीवाशी खेळात आहे असा आरोपही शिंदे यांनी केला. मोदींनी देशाचा राजधर्म पाळला नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बदनामी करणे हाच भाजपचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोप शिंदे यांनी केला .